मुंबई – अभिनेता आर. माधवनचा १६ वर्षीय मुलगा वेदांत माधवन हा एक राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असून, त्याने आतापर्यंत सात पदके जिंकली आहेत. महाराष्ट्र राज्याकडून खेळणारा वेदांत आता ऑलिम्पिक-२०२६ची तयारी करीत आहे, पण या भव्य स्पर्धेच्या तयारीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वीमिंग पूल लागत असून, मुंबईतील जलतरण तलाव कोरोनाच्या संकटामुळे बंद आहेत. त्यामुळेच आर. माधवन कुटुंबासोबत दुबईला शिफ्ट झाला आहे.
याबद्दल बोलताना आर. माधवन म्हणाला, मुंबईतील मोठे जलतरण तलाव हे कोरोनाच्या संकटामुळे सध्या बंद आहेत. त्यामुळे वेदांतच्या सरावासाठी आम्ही दुबईला शिफ्ट झालो आहतो. तो सध्या ऑलिम्पिक खेळाची तयारी करीत असून, मी आणि पत्नी सरिता त्याच्यासोबत आहोत. आर. माधवनने ही माहिती बॉलीवूड हंगामा या चॅनेलशी बोलताना दिली. मी आणि पत्नी सरिता वेदांतसोबत कायम आहोत, तो मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पदके जिंकत असल्याने आम्ही आनंदी असून, आम्हाला त्याचा अभिमान वाटतो असेही तो यावेळी म्हणाला. यावेळी बोलताना आर. माधवनने इतर पालकांना एक सल्लाही दिला. तो म्हणाला, तुमच्या मुलाला ज्या क्षेत्रात काम करायचे आहे, ते त्याला करू द्या. माझा मुलगा माझ्याप्रमाणे अभिनेता नाही झाला याचे मला अजिबात वाईट वाटत नसून उलट मला आता माझ्या करिअरपेक्षा त्याचे करिअर महत्त्वाचे आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …
One comment
Pingback: 토렌트 사이트