ठळक बातम्या

मुलाची लग्नपत्रिका वाटत असतानाच आई-वडिलांचा अपघाती मृत्यू

बीदर – मुलाची लग्नपत्रिका वाटप करून गावाकडे परतताना अपघात होऊन पती-पत्नी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी दुर्घटना बीदर-उदगीर मार्गावरील सेवालाल तांड्याजवळ घडली. सूर्यकांत पाटील (५०) व जयश्री पाटील (४५, रा. मेथी मेलकंदावाडी, हमु. भालकी, जि. बीदर) असे अपघातात मयत झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. सूर्यकांत पाटील यांचा मुलगा साईनाथ याचा विवाह २६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या विवाहाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी सूर्यकांत पाटील व त्यांची पत्नी जयश्री पाटील हे दोघे बिदरला गेले होते. तिथे पत्रिका वाटप करून रात्री उशिरा भालकीकडे परतत होते. तेव्हा बीदर- उदगीर मार्गावरील सेवालाल तांड्याजवळ त्यांची जीप उलटून अपघात झाला. त्यात दोघेही जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती समजताच भालकीचे आमदार ईश्वर खंड्रे व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृत सूर्यकांत पाटील हे ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व भावंडे असा परिवार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …