मुंबई- देशातील १५ ते१८ वर्षेवयोगटातील मुलांचे३ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यासाठी शनिवारपासून कोविन ॲपवर नोंदणीला सुरुवात झाली आहे.नोंदणीसाठी इयत्ता दहावीचेओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. येत्या ३ जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेगाईडलाईन्स जारी केली आहे. लहान मुलांना लस देण्यासाठीची सीरींज, नीडल कदाचित वेगळी असणार आहे. १ जानेवारीपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु होणार आहे.कोविन पोर्टलवर आणखी एक स्लॉट जोडण्यात येणार आहे. तिथून मुलांना लसीकरणासाठी स्लॉट बुक करता येणार आहे. कोविन पोर्टलवर आपला कोविड-१९ वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आयकार्डचा वापर करावा लागणार आहे. ज्या मुलांकडेआधार कार्ड नसेल त्यांच्या लसीकरणात अडथळा येऊ नये म्हणून आयकार्डचा वापर करण्याचा पर्याय केंद्राकडून अंमलात आणण्यात आला आहे. भारत सरकारने१५ ते१८ वर्षवयोगटातील मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि झायडस कॅडिलाच्या झायकोव्ही-डी चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे.
नोंदणीसाठी https://www.cowin.gov.in/ या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी ३ जानेवारी पासून लसीकरणासाठी सेंटर शोधू शकतील. तसेच अपॉइंटमेंट बुक करु शकतील. पोर्टलवर राज्य, जिल्हा किंवा शहरानुसार जवळचं लसीकरण केंद्र उपलब्ध होईल. त्यासोबतच पोर्टलवर गुगल मॅपवर जवळचेलसीकरण केंद्र शोधता येईल. कोविनच्या वेबसाईटवरून किंवा कोविन ॲपवरून लसीकरणासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे. जेणेकरून लसीकरण केंद्र, तारीख, वेळ इत्यादी माहिती तुम्हाला आधीच कळवलं जाईल.
पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या देशाला संबोधित करताना तीन मोठ्या घोषणा केल्या होत्या. यामध्ये सर्वात पहिली घोषणा म्हणजे१५ ते१८ वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु करणार असल्याची मोठी घोषणा केली. हे लसीकरण नव्या वर्षात ३ जानेवारीपासून सुरु होणार आहे. यामुळे शाळांमध्ये अखेरच्या वर्षात तसंच कनिष्ट महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं होतं.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …