मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना स्वत:चा चार्ज दिला आहे का? – राम कदम

मुंबई – सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांचा गेली दोन महिन्यांपासून चाललेल्या संपाबाबत मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह एसटी कामगार संघटनेचे नेते उपस्थित होते. दरम्यान, यावर भाजप आमदार राम कदम यांनी या बैठकीचा एक व्हिडीओ ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा चार्ज शरद पवारांना दिला आहे का?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

मागील दोन महिन्यांपासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत बरी नसल्याने ते प्रत्यक्षात कुठल्याही बैठकीमध्ये सहभागी झाले नाहीत. तसेच, मंत्रालयातही ते फिरकले नाहीत. याच विषयावरून भाजपने वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत. आताच झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्येही मुख्यमंत्री अनुपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीची कायम चर्चा सुरू आहे. एकीकडे मुख्यमंत्री गैरहजर असताना दुसरीकडे मात्र शिवसेनेचे मंत्री वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी चर्चा, बैठका करून राज्यातील प्रश्­नांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून सोमवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या एसटी कर्मचारी संपावरच्या बैठकीत शरद पवार हे प्रमुख मार्गदर्शक होते. हाच धागा पकडून भाजप आमदार राम कदम यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधत या बैठकीचा व्हिडीओ ट्विट करत असे सांगितले आहे की, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा स्वत:चा चार्ज शरद पवारांकडे दिला आहे का? संविधानाला डावलून मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात? आणि शरद पवारांना बैठका घ्यायच्याच असतील, तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत?, असंही कदम यावेळी म्हणाले आहेत.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …