ठळक बातम्या

मुख्यमंत्री रजेवर की कामावर? CM कार्यालयाकडून खुलासा

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सातारा येथील त्यांच्या मूळ गावी आहेत. दरे गावात मुख्यमंत्री शिंदे कुटुंबासह असल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. राज्यात पहिल्यांदाच मुख्यमंत्री रजेवर गेलेत असं सांगत शिंदेंवर निशाणा साधण्यात आला. त्यावरून आता मुख्यमंत्री कार्यालयातून खुलासा करण्यात आला असून शिंदेंनी किती फाईल्सचा निपटारा केला हा आकडाच दिला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातून आलेल्या माहितीनुसार, सातारा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे (VC) मुख्यमंत्री सचिवालयातील ६५ फाईल्सचा निपटारा केला. मुख्यमंत्री सचिवालयात विविध विभागांच्या फाईल्स येत असतात. त्या प्रलंबित राहू नयेत म्हणून नियमित निपटारा करण्यात येतो. मुख्यमंत्री सध्या सातारा दौऱ्यावर असून सचिवालयातील फाईल्स थांबून राहू नयेत म्हणून त्यांनी व्हीसीद्वारे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विभागांच्या ६५ फाईल्सचा निपटारा केला तसेच सूचना ही दिल्या. त्याचसोबत सध्या राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याही अनुषंगाने मदत व पुनर्वसन विभागाला तयारीत राहण्याबाबत निर्देश दिले आहेत.

About admin

अवश्य वाचा

गडचिरोलीत पुन्हा वाघिणीची शिकार?

 नखे, शीर काढून वाघिणीला जमिनीत पुरले गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वनविभागात वाघिणीची शिकार झाल्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *