मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव

मुंबई – मुख्यमंत्र्यांचे ‘वर्षा’ निवासस्थान आणि मुख्यमंत्री कार्यालयात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळे खळबळ उडाली असून, येथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून कोविडच्या चाचण्या करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्यांचीही काळजी घेण्यात येत असून, ही दोन्ही ठिकाणे सॅनिटाइज करण्यात आली आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) सुधीर नाईक यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हाॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवासस्थानातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची तात्काळ तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …