मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकृती उत्तम

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच. एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ.अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी दिली आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृ ती पूर्णपणे स्थिर होती व आता शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील त्यांच्या कक्षात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृ ती उत्तम आणि स्थिर आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. डॉ.अजित देसाई हे हृदयरोग तज्ज्ञ असून, डॉ. शेखर भोजराज हे स्पाईन सर्जन आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून मान आणि मणक्याच्या आजाराने त्रस्त होते. दिवाळीपासून त्यांना हा त्रास जाणवत होता. उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी गिरगावातील एच. एन. रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. शेखर भोजराज यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या सोमवारी त्यांनी आरोग्य तपासणी केली होती.
चंद्रकांत खैरेंचे खडकेश्वराला साकडे!
औरंगाबाद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबईतील रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे माजी खासदार आणि ज्येष्ठ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शहराचे ग्रामदैवत असलेल्या खडकेश्वर मंदिरात सकाळीच महादेवाला अभिषेक केला. मुख्यमंत्री लवकरात लवकर बरे व्हावे, असे साकडे खैरे यांनी ग्रामदेवतेला घातले. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले हेदेखील उपस्थित होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …