मुकेश अंबानी यांनी न्यूयॉर्कमध्ये खरेदी केले ७२८ कोटी रुपयांचे आलिशान हॉटेल

मुंबई – भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांनी एका वर्षाच्या आत आणखी एक हॉटेल खरेदी केले आहे. यापूर्वी मुकेश अंबानींनी लंडनचा कंट्री क्लब आणि गोल्फ रिसॉर्ट स्टोक पार्क विकत घेतला होता, तर आता त्यांनी न्यूयॉर्कचे लक्झरी मँडरीन ओरिएंटल हॉटेल खरेदी केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ७२८ कोटी, म्हणजेच ९.८१ कोटी डॉलर्समध्ये न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित लक्झरी हॉटेल ‘मँडेरीन ओरिएंटल’ची खरेदी केली आहे.
२००३ मध्ये बांधलेले मँडरीन ओरिएंटल हे ८० कोलंबस, न्यूयॉर्क सर्कल येथे स्थित एक प्रतिष्ठित लक्झरी हॉटेल आहे. सेंट्रल पार्क आणि कोलंबस सर्कलच्या अगदी शेजारी हे हॉटेल आहे. रिलायन्सने एका वर्षापेक्षा कमी कालावधीत केलेली ही हॉटेलची दुसरी खरेदी आहे. गेल्या वर्षीच मुकेश अंबानी यांनी ब्रिटनचे पहिला आयकॉनिक कंट्री क्लब आणि गोल्फ रिसॉर्ट स्टोक पार्कला ५७ मिलियन पाउंड म्हणजेच ५९२ कोटी रुपयांत खरेदी केले होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …