मुंबई शहरचा महिला संघ जाहीर

  • पौर्णिमा जेधेकडे संघाचे नेतृत्व

मुंबई – मुंबई शहर कबड्डी असोसिएशनने परभणी येथे २२ डिसेंबरपासून होणाऱ्या ‘वरिष्ठ महिला गट’ राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेकरिता आपला संघ जाहीर केला. या संघाचे नेतृत्व पौर्णिमा जेधे या अनुभवी खेळाडूकडे सोपविण्यात आले आहे. ४ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून हा संघ निवडण्यात आला. हा संघ २१ डिसेंबर रोजी रात्री देवगिरी एक्सप्रेसने स्पर्धेकरिता रवाना होईल, असे एका पत्रकाद्वारे मुंबई शहर कबड्डी संघटनेचे सरचिटणीस विश्वास मोरे यांनी प्रसार माध्यमांना कळविले आहे.

निवडण्यात आलेला संघ खालीलप्रमाणे.

महिला संघ – पौर्णिमा जेधे – संघनायिका, जागृती घोसाळकर – उपसंघनायिका, पूजा यादव, श्रावणी घाडीगांवकर, साधना विश्वकर्मा, प्रतीक्षा तांडेल, श्रद्धा कदम, प्रीती हांदे, योगिता राऊत, प्रतीक्षा धामणकर, विशाखा पाटील, स्नेहा गुप्ता.

प्रशिक्षक : आनंदा शिंदे, व्यवस्थापिका : सुनीता जाधव.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …