मुंबई विमानतळावर २० कोटींचे अमली पदार्थ जप्त, दोन परदेशी महिलांना अटक

मुंबई – मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २० कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. सीमाशुल्क विभागाने या प्रकरणी दोघा परदेशी महिलांना अटक केली आहे. क्येनगेरा फातुमा (४५) व मनसिंबे झायनाह (२७) अशी अटक केलेल्या महिलांची नावे असून, त्या युगांडा देशाच्या नागरिक आहेत.
क्येनगेरा आणि मनसिंबे या दोघींनी हेरॉईनचा साठा सुदानवरून मुंबईत एका तस्कराला देण्यासाठी आणला होता. दोघीही दुबईमार्गे भारतात दाखल झाल्या होत्या. दुबईवरून दोन महिला अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीमाशुल्क विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. स्कॅनरद्वारे त्यांच्याकडील सामानाची तपासणी केली असता त्यात संशयास्पद पूड आढळली. पडताळणी अंती ते हेरॉईन असल्याचे निष्पन्न झाले. दोघींकडे तीन किलो ९१० ग्रॅम हेरॉईन सापडले असून, त्याची किंमत सुमारे २० कोटी रुपये आहे. दोघींना अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. झायनाहकडे एक किलो ९४२ ग्रॅम, तर तिची आई फातुमाकडे एका किलो ९६८ ग्रॅम हेरॉईन सापडले. दोघींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …