ठळक बातम्या

मुंबई महापालिका निवडणूक लांबणार? : नव्या प्रभागांना अद्याप मंजुरी नाही

मुंबई – आगामी निवडणुकीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघांमध्ये फेरबदल आणि वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने नव्या २३६ प्रभागांचे सीमांकनही तयार केले आहेत, मात्र राज्य सरकारने अद्याप याबाबत अंतिम अधिसूचना जारी केलेली नाही. मुंबईत सध्या २२७ वॉर्ड आहेत जे २०२२ पासून २३६ पर्यंत वाढवले जाणार आहेत. हे नऊ अतिरिक्त प्रभाग-पश्चिम उपनगरांत पाच, पूर्व उपनगरांत तीन आणि शहरात एक जोडला जाणार असल्याची माहिती मिळतेय. पालिकेने २०१७च्या निवडणुकीत सुद्धा मुंबईतील प्रभागांच्या हद्दीतही फेरबदल आणि सुधारणा केल्या होत्या.
निवडणूक आयोग आणि राज्यपाल कार्यालयातून अंतिम मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकार अधिसूचना जारी करेल. लोकसंख्या बदलानुसार नवीन निवडणूक प्रभागांचे सीमांकन, फेब्रुवारी २०२२च्या निवडणुकीपूर्वी करण्यात आले आहे, पण मंजुरीनंतरही इतर अनेक प्रक्रिया आहेत, ज्या फेब्रुवारीपूर्वी पूर्ण होणे कठीण आहे. त्यामुळे २०२२ची मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याची दाट शक्यता आहे.
नवीन प्रभाग सीमा निश्चित झाल्यानंतर, रहिवाशांच्या सूचना आणि हरकती मागवल्या जातील. प्रत्येक वॉर्डाची सरासरी ५४,००० लोकसंख्या आहे, याची पालिकेला खात्री करावी लागेल, ज्यात १० टक्क्यांपर्यंत फरक असू शकतो. याव्यतिरिक्त, जागांच्या आरक्षणाची लॉटरी काढली जाईल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि महिलांसाठी आरक्षणाची लॉटरी काढली जाईल. केवळ दोन महिने शिल्लक असताना ही प्रक्रिया इतक्या लवकर पूर्ण होणार नाही, त्यामुळे निवडणुका वेळेवर होणे कठीण आहे, असे नगरसेवकांचे मत आहे.
भाजपने याआधी राज्य सरकारच्या मुंबईत नवीन प्रभाग जोडण्याच्या योजनेला निवडणुका लांबवण्याचा डाव आहे, असा आरोप केला होता. मविआ सरकार स्थापन झाल्यामुळे शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेस एकत्र आहेत. सुरुवातीपासून बीएमसीमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढले आहेत, पण यंदा चित्र वेगळे आहे. राज्यात भाजप एकटा आहे. दरम्यान, भाजप मनसेशी जवळीक साधत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईची निवडणूक शिवसेना आणि भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. मुंबई महापालिका निवडणुकीला राजकारणात नेहमीच राष्ट्रीय महत्त्व असते. बृहन्मुंबई महापालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. याच कारणामुळे २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी आले होते.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …