मुंबई, पुण्यापाठोपाठ औरंगाबादमधील शाळाही आजपासून बंद

 

औरंगाबाद – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धसका सध्या प्रशासनाने घेतला आहे. त्याच अनुषंगाने मुंबई, पुण्यानंतर आता औरंगाबादमधील शाळाही आजपासून म्हणजेच ६ जानेवारीपासून बंद ठेवण्याचा मोठा निर्णय महापालिकेने घेतला आहे. येथे आजपासून पहिली ते आठवीच्या महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेने काढले आहे. महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी हा निर्णय घेतला आहे.

४ जानेवारी रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढलेली दिसून आली. या दिवशी जिल्हाभरात १०४ रुग्णसंख्या नोंदवली गेली. त्याआधी संपूर्ण आठवड्यातील रुग्णसंख्येत हळूहळू वाढ दिसून येत होती, मात्र रुग्णांनी पन्नाशी पार केली नव्हती. ४ जानेवारी रोजी अचानक रुग्णांनी शंभरी पार केल्याने ही तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याची शंका स्थानिक डॉक्टरांनी व्यक्त केलेली. या पार्श्वभूमीवर बुधवारी औरंगाबाद महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील पहिली ते आठवी वर्गासाठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ६ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत येथील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद राहणार आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …