मुंबई एअरपोर्टवर टळली मोठी दुर्घटना

पुशबॅक देणाऱ्या वाहनाला प्रवाशांनी भरलेल्या विमानाजवळच आग

मुंबई – मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली. प्रवाशांनी भरलेल्या विमानाला पुशबॅक करण्यास आलेल्या वाहनाला विमानजवळच भीषण आग लागली. हे विमान मुंबईवरून जामनगरला निघाले होते. ६५७ क्रमांकाचे हे विमान असल्याची माहिती समोर येत आहे. जेव्हा हे विमान रनवेवर ढकलण्यास पुशबॅक वाहन आणण्यात आले आणि ते विमानाला जोडण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याच वेळेस विमानाच्या जवळच या पुशबॅक वाहनाने पेट घेतला.

सुदैवाने दुसऱ्या पुशबॅक वाहनाला विमानापासून लगेच थोडे दूर करण्यात आले आणि विमान तळावरील अग्निशमन यंत्रणांनी आगीवर काही वेळातच नियंत्रण मिळविले. मिळालेल्या माहितीनुसार यात सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत, मात्र ही आग कोणाच्या चुकीने लागली याबाबत आता यंत्रणा तपास करीत आहेत, मात्र दैव बलवत्तर म्हणून मुंबईच्या विमानतळावरील मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …