मुंबईसह महाराष्ट्रावर ड्रोन हल्ल्याचं सावट: डार्कनेटवर शिजला दहशतवाद्यांचा कट

* राज्यातील सर्व प्रमुख शहरं अलर्ट
मुंबई – प्रजासत्ताक दिन जेमतेम दोन आठवड्यांवर येऊन ठेपला असताना महाराष्ट्रावर दहशतवादी हल्ल्याचेसावट आहे. जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये ड्रोन हल्ल्यांची भीती नेहमीच व्यक्त केली जाते. पण मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्यांबाबतचं संभाषण चौकशी यंत्रणांना कळल्यानं पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. केंद्रीय तपास यंत्रणेच्या मार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरं अलर्टवर आहेत. नागरिकांनाही सतर्कराहण्याच्या सूचना तपास यंत्रणांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.
मुंबईला हादरवून टाकणारं डार्क नेटचं कारस्थान पुन्हा एकदा समोर आले आहे. जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये संभाव्य ड्रोन हल्ल्यांबाबत केंद्रीय तपास यंत्रणा सतत सतर्कतेची सूचना देत असतात. तपास यंत्रणांना नुकतेच अशी माहिती मिळाली आहे की, डार्क नेटचा वापर करुन मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्या घडवण्याबद्दल दहशतवादी संभाषण करत आहेत.
महाराष्ट्र सायबर आयजी यशस्वी यादव यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, दहशतवादी प्रवृत्तीच्या व्यक्ती ड्रोन हल्ले, रासायनिक हल्ले आणि सायबर हल्ल्यांबद्दल डार्क नेटवर चर्चा करत होते. सरफेस इंटरनेटच्या तुलनेत डार्क नेट ९९ टक्के आहे. टोर ब्राउझर हा डार्क नेटमध्ये वापरला जातो, जो सहज ट्रेस करता येत नाही. कारण त्यात अनेक प्रॉक्सी बाऊन्सिंगचा वापर केला जातो. मुंबईसह इतर महत्त्वाच्या शहरांवर ड्रोन हल्ल्यांबाबत अनेकदा अलर्ट दिले जातात.
ड्रोन हल्ल्यात 20 किमी ते 30 किमी अंतरावरुनही निशाणा साधला जाऊ शकतो. ड्रोनवर पेलोड बसवता येतात. याशिवाय, त्यांना बॅकट्रॅक करणे सोपे नाही. गुन्हेगाराने मोबाईल फोन वापरला, तर त्याच्या आयएमईआय क्रमांकावरुन शोध लावला जाऊ शकतो, परंतु ड्रोन मागे टाकून गुन्हेगाराचा शोध लावता येत नाही. त्यामुळेच महाराष्ट्रात लवकरात लवकर ड्रोनविरोधी यंत्रणा बसवावी, अशी मागणी केली जाते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …