ठळक बातम्या

मुंबईत १५ मिनिटांत दोघांची हत्या; सायको किलरला अटक

मुंबई – रमण राघव, बियर मॅन यांच्यानंतर मुंबईत आणखी एका सायको किलरची दहशत पाहायला मिळत आहे. अवघ्या १५ मिनिटांत दगडाने ठेचून दोघांची हत्या करणाऱ्या सायको किलरला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सुरेश शंकर गौडा (४०) असे आरोपीचे नाव आहे.
भायखळा येथील फळ मार्केटच्या पदपथावर झोपलेल्या एका व्यक्तीची पेव्हर ब्लॉकने डोके ठेचून हत्या करण्यात आली. जवळपास १५ मिनिटांत येथूनच पुढे जे. जे. मार्ग परिसरात अशाच प्रकारे पदपथावर झोपलेल्या आणखी एकाची पेव्हर ब्लॉकने हत्या करण्यात आली. लागोपाठ एकाच पद्धतीने दोघांची हत्या करण्यात आल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. गुन्हे पद्धतीवरून एकाच व्यक्तीने या हत्या करण्यात आल्याने पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांची झाडाझडती सुरू केली. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तींची ओळख पटत नसल्याने आरोपीला शोधण्यात अडचणी येत होत्या. जे. जे. मार्ग पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, भायखळा येथे लोकलने उतरलेला व्यक्ती या हत्या करताना दिसत आहे, मात्र रात्रीची वेळ असल्याने त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. फुटजेमध्ये हा व्यक्ती दक्षिण मुंबईच्या दिशेने येत असल्याने पोलिसांनी पायधुनी, मोहम्मद अली रोडचा परिसर पिंजून काढत पोलीस ठाण्याच्या जवळच पदपथावर वास्तव्य करणाऱ्या सुरेश शंकर गौडा (४०) याला अटक केली. जे. जे. मार्ग पोलिसांनी पकडलेला सुरेश गौडा हा हत्या करण्यात आलेल्या दोघांनाही ओळखत नाही. कशासाठी मारले असे विचारले असता तो सहजच मारले, अशी काहीही उत्तरे देत आहे.
सुरेश शंकर गौडा याच्यावर २०१५ सालीही अशाच प्रकारे कुर्ल्यात एकाची हत्या केल्याचा आरोप आहे, मात्र पुराव्याअभावी त्याची २०१६ साली सुटका झाली होती. त्यामुळे आरोपी गौडाने अशा अनेक हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुंबई पोलीस फुटपाथवर झालेल्या सर्व हत्यांच्या केसेस पडताळून पाहत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

3 comments