मुंबईत मलेरिया, गॅस्ट्रोचा कहर सुरूच; पाच दिवसांत ११८ रुग्ण

मुंबई – वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस याचा फटका मुंबईकरांच्या आरोग्याला बसत असून, केवळ ५ दिवसांत मलेरिया, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या तब्बल ११८ रुग्णांची भर पडली आहे. लेप्टो, हेपिटायटीस, चिकनगुनिया आणि एच १ एन १ हे आजार मात्र नियंत्रणात आले आहेत. मलेरियाचा जोर सर्वाधिक असून, या आजाराचे ५६ रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल डेंग्यूचे १२, तर गॅस्ट्रोची ५० जणांना बाधा झाली आहे. तीनही आजारांचे ११८ रुग्ण सापडले आहेत.
नोव्हेंबर महिन्यातही या आजारांनी हाहाकार माजवला होता. या एका महिन्यात मलेरिया ३२६, डेंग्यू १०६, तर गॅस्ट्रोच्या ३१३ रुग्णांची नोंद झाली होती. महानगरपालिकेने अनेक उपाययोजना करून देखील हे आजार फोफावत असून, डिसेंबर महिन्यातही मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. लेप्टो, हेपिटायटीस, चिकनगुनिया आणि एच १ एन १ हे आजार मात्र नियंत्रणात आले आहेत. लेप्टो आणि एच १ एन १चा एकही रुग्ण सापडला नसून, हेपिटायटीस ४, तर चिकनगुनियाचे २ रुग्ण आढळले आहेत. नोव्हेंबर महिन्यात लेप्टो १०, हेपिटायटीस ३७, चिकनगुनिया २० आणि एच १ एन १चा एक रुग्ण सापडला होता.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …