मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत चिंताजनक अशी वाढ होत आहे. त्यातच मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढ ही २० हजारांपर्यंत पोहोचल्यामुळे चिंतेत भर पडली होती; मात्र आता गेल्या दोन दिवसांपासून काहीसा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत नव्या कोरोना रुग्णांची संख्या कमी नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी मुंबईमध्ये ११ हजार ६४७ रुग्णांची नोंद झाली. तर १४ हजार ९८० रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर मंगळवारी दिवसभरात मुंबईमध्ये कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला; मात्र चिंतेची बाब म्हणजे मुंबईमध्ये कोरोनाचे अद्यापही १ लाख ५२३ सक्रिय रुग्ण आहेत.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …