मुंबईत चोरट्यांनी बॉलीवूड अभिनेत्रीची पर्स हिसकावली; झटापटीत अभिनेत्री जखमी

मुंबई – एका ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्रीची चोरट्यांनी पर्स हिसकावल्याची घटना समोर आली आहे. संबंधित अभिनेत्री औषध आणण्यासाठी मेडिकलमध्ये जात असताना, हा धक्कादायक प्रकार घडला. यावेळी दुचाकीवरून आलेल्या भामट्यांना पकडण्याच्या प्रयत्नात संबंधित अभिनेत्री जखमी झाली आहे. याप्रकरणी अभिनेत्रीने पोलिसांत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केली नसल्याची माहिती वर्सोवा पोलिसांनी दिली.

सलमा आगा, असे संबंधित अभिनेत्रीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमा या शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास रिक्षाने मेडिकलमध्ये औषध आणण्यासाठी जात होत्या. दरम्यान त्याठिकाणी आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या हातातील पर्स हिसकावून पळ काढला. याप्रकरणी पीडित अभिनेत्रीने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांकडे दरोड्याची तक्रार देण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी पर्स हरवल्याची तक्रार केली, तरच आरोपींना शोधू असे सांगितले, असा आरोप सलमा आगा यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास सलमा आगा यांचा कारचालक गाडी बंगल्यात सोडून घरी निघून गेला होता; पण रात्री तीनच्या सुमारास आगा यांना औषध आणण्यासाठी मेडिकलमध्ये जायचे होते. यावेळी कारचालक घरी नसल्याने त्या रिक्षाने मेडिकलमध्ये गेल्या. याचवेळी वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांची पर्स हिसकावली. याप्रकरणी कोणतीही तक्रार देण्यात आली नसल्याची माहिती वर्सोवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिराज इनामदार यांनी दिली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …