मुंबईतील ५०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ – राज्य सरकारनेघेतला निर्णय


मुंबई – मुंबईकरांना राज्य सरकारने मोठेगिफ्ट दिलेअसून ५०० स्क्वे. फुटापर्यंतच्या घरांना यापुढे मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिवसेना आश्वासनेनाही तर वचननामा देतेआणि तेपाळते असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले. देशाचे आर्थिक केंद्र असणाऱ्या मुंबईकरांना हा दिलासा देण्याचा प्रयत्न असून ज्यांनी कष्ट करून, घाम गाळून मुंबईला उभे केले त्यांच्यासाठी हा निर्णय आहे. त्यांच्यासाठीच्या वचनाला आपण आज जागलो आहोत असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शनिवारी नगरविकास खात्याची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील ५०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा सर्वसामान्यांना होणार असून जवळपास २८ लाख कुटुंब राहतात. या कुटुंबांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना नव्या वर्षात हे मोठं गिफ्ट मिळाले आहे. मालमत्ता करात माफी दिल्यामुळे आता महापालिकेचा दरवर्षी ३४० कोटींचा कर बुडणार आहे.
शिवसेना वचननामा देते, आणि ती पाळते असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईकरांना ५०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचेवचन २०१७ साली दिले होते. ते आता शिवसेनेने पाळले. मुंबईकरांनी शिवसेनेवर भरभरुन प्रेम केले. या मुंबईकरांना दिलेल्या वचनाला आज शिवसेना जागली आहे.
मुंबईकर म्हटले की मुंबईकरांनी फक्त करच भरायचे का? मुंबईकर आधीच कर एवढा कर देत आहेत, त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांनी मुंबईवर जे प्रेम केले तेच प्रेम आम्ही पुढे नेत आहोत, आता माझ्या ताण आदित्य ठाकरेंनी कमी केला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवसैनिकांनी दिलेली वचने पाळायला शिवकले आहे, त्यामुळे आम्ही वचन देतो आणि ते पाळतो, लोकांना निवडणुकीत दिलेली बरीच वचने पूर्ण केली आहेत, असेही मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …