मुंबईतील रिक्षा चोरांची टोळी जेरबंद; चोरीनंतर बदलायचे रिक्षाची नंबर प्लेट

मुंबई – गोरेगावच्या आरे पोलिसांनी एका रिक्षाचोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत चार चोरट्यांना अटक केली. संबंधित चोरटे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रिक्षा चोरायचे. संबंधित रिक्षाची नंबर प्लेट बदलून ती रिक्षा चक्क पाच हजार रुपयांना विकायचे, तर काही रिक्षा चालकांना चोरीची रिक्षा भाडेतत्वावर द्यायचे. चोरीचा रिक्षा भाड्याने देत आरोपी दररोज तीनशे रुपयांची कमाई करत होते. पोलिसांनी या रिक्षाचोर टोळीचा पर्दाफाश केला असून, चार जणांना अटक केली आहे. याप्रकरणी आरे पोलिसांनी नालासोपारा, अंधेरी, गोरेगाव परिसरातून ६ रिक्षा जप्त केल्या आहेत. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

समद शब्बीर शेख (२४), सुफियान इम्रान खान (२५) रफिक रहमान खान (३०) व आमिर शरीफ भट (२४) अशी अटक केलेल्या रिक्षा चोरांची नावे आहेत. संबंधित सर्व आरोपींना आरे पोलिसांनी मुंबई, ठाणे, पवई आणि अन्य भागांतून अटक केली. संबंधित सर्व आरोपी पवई येथील रहिवासी असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक रिक्षा चोरीची तक्रार प्राप्त झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरे पोलिसांनी मुंबई, ठाणे आणि पवई परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल लोकेशनच्या आधारे चार चोरट्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी चार आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच अशाप्रकारे मुंबई शहरात एकूण सहा रिक्षा चोरल्याची कबुलीही आरोपींनी दिली. संबंधित सर्व आरोपी मुंबईतील विविध भागांतून ऑटो रिक्षा चोरायचे. त्यानंतर रिक्षाची नंबर प्लेट बदलून ५ हजारांना विकायचे. चोरीची ऑटोरिक्षा खरेदी करणारी व्यक्ती ऑटोरिक्षाला भाडं म्हणून आरोपींना दररोज तीनशे रुपये द्यायचे. यातील सुफियान हा सराईत गुन्हेगार असून, तो चेन स्नॅचिंगचा मास्टर माइंड देखील आहे. त्याच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत. या घटनेचा पुढील तपास आरे पोलीस करत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …