मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद

मुंबई – देशभरासह महाराष्ट्रातही कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यातच मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑफलाइन शाळा बंद असल्या, तरी ऑनलाइन शिक्षण मात्र सुरू राहणार आहे. हा निर्णय फक्त मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांसाठी आहे.

इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री यांनी सर्व संबंधितांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते, तसेच प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाची काय परिस्थिती आहे, त्यानुसार शाळासंदर्भात काय निर्णय घ्यायचा यावर चर्चा करण्यात आली होती. मुंबईमधील पहिली ते आठवीच्या शाळा १५ डिसेंबरपासून सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबईमधील बहुतेक शाळांनी ऑनलाइन शिक्षण बंद केले आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ होत आहे, त्यामुळे मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सांगितले जात आहे. पहिली ते आठवीच्या शाळा नुकत्याच सुरू झाल्या होत्या, मात्र पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी शाळांबाबत अखेर निर्णय घेतला आहे. ऑफलाइन शाळा बंद असल्या, तरी ऑनलाइन शाळा या सुरू राहणार आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …