मुंबईतील पहिला स्कायवॉक होणार इतिहासजमा

मुंबई – वांद्रे पूर्व ते वांद्रे न्यायालय आणि कलानगरपर्यंत असणारा मुंबईतील पहिला स्कायवॉक आता इतिहास जमा होणार आहे. कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी पादचाºयांसाठी बंद करण्यात आलेला हा स्कायवॉक आता पाडण्यात येणार आहे. या स्कायवॉकच्या जागी आता नव्याने स्कायवॉक उभारला जाणार आहे; मात्र या स्कायवॉकचा वापर होत नसताना आता पुन्हा नवीन पूल कशासाठी?, असा सवाल विचारला जात आहे.
महापालिकेच्या ‘एच/पूर्व’ विभागामधील वांद्रे स्थानकापासून फॅमिली कोर्टपर्यंत हा स्कायवॉक २००७-०८ साली एमएमआरडीएमार्फत बांधण्यात आला होता व सन २०१५ मध्ये हा स्कायवॉक महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आला होता, परंतु त्यानंतर या स्कायवॉकचे स्थितीदर्शक व पुन:सर्वेक्षण व्हीजेटीआय या संस्थेमार्फत करण्यात आले. या स्कायवॉकचे स्ट्रक्चरल स्टीलमध्ये बांधण्यात आल्याने खाडीलगतच्या खराब वातावरणामुळे गंजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे हा स्कायवॉक सन २०१९ पासून पादचाºयांसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे या स्कायवॉकचे बांधकाम पाडून त्या जागी पुनर्बांधकाम करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
स्कायवॉक बांधल्यापासून त्याचा वापर कमी होत असल्याने याचा हेतू साध्य झाला नव्हता. कोट्यवधी रुपये खर्च करून एमएमआरडीएने बांधलेला हा स्कायवॉक केवळ प्रेमी युगलांचा आणि गर्दुल्यांचा अड्डा बनला होता. सध्या बंद अवस्थेत असलेल्या या स्कायवॉकच्या जागी नव्याने स्कायवॉक बांधला जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या पूल विभागाने निविदा मागवली होती. या निविदेमध्ये एन. ए. कन्स्ट्रक्शन कंपनीने विविध करांसह १८.६९ कोटी रुपयांमध्ये काम मिळवले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …