मुंबई – मुंबईत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे पालिकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. मुंबई महापालिकेच्या २४ विभागांपैकी अंधेरी पश्चिम, बांद्रा, अंधेरी पूर्व, कांदिवली, मालाड, बोरिवली, माटुंगा, खार या विभागांत आठवडाभरात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर सँडहर्स्ट रोड, मरिन लाइन्स आणि चेंबूर या विभागात सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबईमध्ये १ जानेवारी ते ७ जानेवारीदरम्यान ८४ हजार ३२० रुग्णांची नोंद झाली आहे. या आठवडाभराच्या कालावधीत सर्वाधिक ‘के’ वेस्ट अंधेरी पश्चिम येथे ९७८८, ‘एच’ वेस्ट बांद्रा येथे ७२८९, ‘के’ इस्ट अंधेरी पूर्व येथे ६६०७, ‘आर’ साऊथ, कांदिवली येथे ४५९४, ‘पी’ नॉर्थ मालाड येथे ४४६८, ‘आर’ सेंट्रल बोरिवली येथे ४३२३, ‘एफ’ नॉर्थ माटुंगा येथे ४१६६, ‘एच’ ईस्ट खार येथे ४०१८ रुग्णांची नोंद झाली. मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यानंतर मागील दोन वर्षे कोरोना विरोधात लढा सुरू आहे. पहिल्या लाटेत दिवसाला २८००, मागील वर्षी एप्रिल महिन्यात दुसºया लाटेत ११ हजार ५०० रुग्ण आढळून आले. आता तिसºया लाटेत दिवसाला २० हजारांवर रुग्ण आढळून येत आहेत. रोज आढळून येणाºया रुग्णांची संख्या वाढत असून, काही भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …