ठळक बातम्या

मुंबईतील ‘ त्या’ अपहरण नाट्याला कलाटणी

मुलगी नको म्हणून जन्मदात्या आईनेच काढला तीन महिन्यांच्या लेकीचा काटा
मुंबई – शहरातील काळाचौकी परिसरातून बेपत्ता झालेल्या तीन महिन्यांच्या मुलीचा शोध अखेरीस संपला आहे. सुरुवातीला अपहरण केल्याचा बनाव केलेल्या जन्मदात्या आईनेच या तीन महिन्यांच्या मुलीसोबत लांच्छनास्पद असे कृ त्य केले आहे. या महिलेने मुलगी नको म्हणून तीन महिन्यांच्या मुलीची हत्या केली आहे. क्रूरकर्मा आईने चिमुकलीची हत्या करून तिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत ठेवला होता. याआधी लेकीची हत्या करून तिचे अपहरण झाल्याचा बनाव आरोपी आईने केला होता. सपना मगदूम असे या आरोपी आईचे नाव आहे.
काळाचौकी परिसरात ३० नोव्हेंबर रोजी एक धक्कादायक घटना घडली होती. एका आईने आपल्या तीन महिन्यांच्या मुलीचे भांडी विकणाऱ्या महिलेने अपहरण केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर मुंबईत एकच खळबळ उडाली होती. गायब असलेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली होती, मात्र दोन दिवसांत या अपहरण प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या आईनेच पोटच्या मुलीचा खून केला आहे. मुलगी नको होती म्हणून आईने हे अमानुष कृ त्य केले आहे. विशेष म्हणजे मुलीचा खून करून या आईने तिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत ठेवला होता. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर आता मुलीचा मृतदेह सापडला आहे.
खुनी आईने आपल्या मुलीची हत्या करून तिचे अपहरण झाल्याचा खोटा आरोप केला होता. महिलेने तक्रारीत भांडी विकणाऱ्या महिलेनेच माझ्या मुलीला पळवल्याचे म्हटले होते. ३० नोव्हेंबरला दुपारी १२ ते १ च्या सुमारास एक ३० ते ३५ वर्षांची महिला आली आणि जुन्या मोबाइलच्या बदल्यात नवीन भांडी देण्याचे सांगून तिने आपला विश्वास संपादन केला. जुना मोबाइल आणण्यासाठी आपण आतल्या रूममध्ये जात असताना भांडी विकणारी महिला मागून आली आणि तिने बेशुद्ध करण्याचे औषध आपल्या नाकाला लावले. त्यानंतर पलंगावर झोपलेल्या चिमुकलीला या महिलेने उचलले आणि आपल्या सोबत घेऊन पसार झाली, असा दावा या क्रूरकर्मा आईने केला होता.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …