मुंबईतील टँकर माफियांवर कारवाई करा – आशिष शेलार

मुंबई – मुंबई महापालिका समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी १८ हजार कोटी खर्च करण्याचे प्रस्तावित करत आहे, त्यावेळी मुंबईत होणारी प्रचंड मोठी पाणी चोरी, टँकर माफिया आणि त्यातून होणारी अंदाजे ३,००० कोटींची बेकायदेशीर अनियमित उलाढाल ‘हेही’ एकदा तपासून पाहा, असे भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्र लिहून पालिका आयुक्त आणि भूजल आयुक्तांच्या लक्षात आणून दिले आहे.
पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आयुक्‍त सी. डी. जोशी यांना पत्र लिहून आशिष शेलार यांनी मुंबईसह एमएमआरमधील पाणी चोरी व पाण्याचा होणारा बेसुमार उपसा याबाबत काही गंभीर बाबी निदर्शनास आणून दिल्या आहेत. यावर एसआयटी नियुक्त करून चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …