मुंबईतील जमावबंदी १५ जानेवारीपर्यंत वाढवली

मुंबई – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. संध्याकाळी ५ ते पहाटे५ वाजेपर्यंत चौपाटी, सार्वजनिक स्थळ, गार्डन, रिकामी मैदान समुद्रकिनारी जाण्यास मुंबई पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. सुरूवातीला पोलिसांनी ७ जानेवारी २०२२ पर्यंत जमावबंदी लागू केली होती, मात्र आता कलम १४४ चा कालावधी पोलिसांनी १५ जानेवारी पर्यंत वाढवला आहे. याबाबतीत सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी माहिती दिली आहे.
विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले, ३१ डिसेंबरच्या अनुशंगाने नागरिकांनी पँनिक होऊ नये. मुंबईत चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. घातपाताच्या अनुशंगाने सर्व मेजर काळजी घेण्यात आलेली आहे. कोरोनाच्या नव्या नियमावलीनुसार महापालिकेच्या पथकासोबत पोलीसही कारवाईत सहभागी राहणार आहेत. याबाबत सर्व पोलिस पथक, पोलीस ठाण्याना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घरी राहून यंदाचा ३१ डिसेंबर साजरा करावा असेआवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
राज्यात गुरुवारी तब्बल ५ हजार 368 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय, 371 जणांनी कोरोनावर मात केलीय. ज्यामुळे राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 49 हजार 159 वर पोहचलीय. दरम्यान, बरे झालेल्या रुग्णांचा दर 96 टक्क्यांवर गेलाय. मुंबईत सध्या 11 हजार 360 रुग्ण सक्रीय आहेत. शहरातील रुग्ण दुप्पटीचा दर 505 दिवसांवर पोहचला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …