मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाणांसाठी डीसीआर तयार

मुंबई – मुंबईतील कोळीवाडे, गावठाण आणि आदिवासी पाड्यांच्या पुनर्विकासासाठी अखेर विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यात आली आहे. कोळीवाडे हे मुंबईतील मूळ रहिवासी क्षेत्र म्हणून ओळखले जातात. तरीही, मुंबई २०१४ ते २०३४ च्या विकास आराखड्यात त्यांचा समावेश नसल्याची कोळी बांधवांची तक्रार होती. आता, विकास नियंत्रण नियमावलीनुसार कोळीवाडे आणि गावठाणांचे रस्ते १ ते १२ मीटरचे असल्यास, त्यांच्या परिसरातील भूखंडाच्या विकासासाठी जास्तीत जास्त २.७ एफएसआय मिळू शकतो. तर अक्सा गाव, मार्वे किंवा सीआरझेड क्षेत्र असल्यास विकासकांना फक्त ०.५ एफएसआय मिळेल, त्यापेक्षा जास्त नाही. हा डीसीआर अंतिम मंजुरीसाठी राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती मिळत आहे. कोळीवाडे हे मुंबईतील मूळ रहिवासी क्षेत्र म्हणून ओळखले जातात. मुंबईत मढ, वर्सोवा, बोरिवली, माहुल, मालवणीसह एकूण १३ कोळीवाडे आहेत. जे मुंबईच्या प्रमुख ठिकाणी वसलेले आहेत. सीआरझेड कायद्यात करण्यात आलेल्या बदलांमुळे समुद्रकिनारी नव्या बांधकामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …