मुंबईतील उच्चभ्रू वस्त्यांमध्येच कोरोनाचा थैमान!

  •  उच्चशिक्षितांकडूनच नियमांना हरताळ

मुंबई – शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या कोरोना रुग्णवाढीला कारणीभूत उच्चशिक्षित व उच्चभ्रू वस्त्यांमधील धनाढ्य मंडळीच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात झालेल्या २८२ चाचण्यांमध्ये तब्बल ५५ टक्के रुग्ण झपाट्याने पसरणाऱ्या ओमिक्रॉनचे असल्याचे समोर आले आहे.
भारतात कोरोना पसरवण्याचे सुरुवातीचे कार्य हे मुळात उच्चभ्रू वस्त्यांतील मंडळींनीच केले हे तर सर्वश्रुत आहे. आता तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत तब्बल ९० टक्के रुग्ण हे उच्चभ्रू वस्ती-इमारतींमधील असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. यामध्ये ‘ए’ विभाग कुलाबा-फोर्ट, ‘डी’ विभाग ग्रँट रोड-गिरगाव परिसर, अंधेरी पूर्व-पश्चिम आणि वांद्रे पूर्व-पश्चिममध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट पूर्ण आटोक्यात आल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. १०० पर्यंतखाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या आता थेट पाच हजारांवर गेल्याने तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत, मात्र या रुग्णंख्येत झोपडपट्टीपेक्षा इमारतींमधील बाधितांची संख्या सर्वाधिक असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परदेशातून आल्यानंतर विमानतळावर होणाऱ्या चाचण्यांमध्ये हे प्रवासी बाधित असल्याचे स्पष्ट होत नसले, तरी काही दिवसांनी हेच प्रवासी बाधित होत आहेत. या काळात संबंधित प्रवाशांचा कुटुंबासह अनेकांशी संपर्क येत असल्यामुळे, मीटिंग-कार्यक्रमांना हजेरी लावली जात असल्यामुळेच उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कोरोना वेगाने पैलावत असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …