मुंबईतील इमारती ठरतायेत कोरोना हॉटस्पॉट – काकाणी

मुंबई – मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे, मात्र समाधानाची बाब म्हणजे जवळपास ९० टक्के रुग्णांना कोणत्याही स्वरूपांची लक्षणे आढळून आलेली नाहीत. शहरातील सुमारे ९३ टक्के कोरोनाबाधित हे इमारतींमध्ये राहणारे आहेत. मुंबईच्या ज्या भागांमध्ये इमारतीचे प्रमाण अधिक आहे, तसेच जिथे उच्च मध्यम वर्गीयांची वस्ती आहे, अशी ठिकाणे हे कोरोनाचे नवे हॉटस्पॉट ठरत असल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली.
मुंबईमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, मात्र यातील जवळपास नव्वद टक्के लोकांना लक्षणेच नसल्याने कोरोनाबाधितांसाठी आरक्षित असलेले शहरातील ८० टक्के बेड रिकामे असल्याचेही काकाणी म्हणाले. आरोग्य सेवक हे सातत्याने कोरोनाबाधितांच्या संपर्कात येत असल्याने त्यांना कोरोना होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. सध्या मुंबईत परिस्थिती नियंत्रणात असून, मुंबईत निर्बंध वाढवण्याचा कोणताही विचार नाही. दोन-तीन दिवसांनंतर पुन्हा एकदा कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. तेव्हा जर निर्बंध वाढवण्याची आवश्यकता वाटल्यास निर्बंध वाढवू, असे काकणी यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …