मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांना कोरोनाची लागण

मुंबई – राज्यात कोरोना, ओमिक्रॉनचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. पोलीस दलातही त्याचा शिरकाव पहायला मिळत आहे. मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह डझनभर वरिष्ठ अधिकारी पॉझिटिव्ह सापडले आहेत.

मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असून, सर्वांची प्रकृती चांगली आहे. नांगरे-पाटील यांच्याव्यतिरिक्त अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत, संदीप कर्णिक, सत्यनारायण चौधरी, तसेच उपायुक्त डॉ. हरी बालाजी, गीता चव्हाण, सोमनाथ घार्गे, विशाल ठाकूर, दत्ता नलावडे, प्रकाश जाधव, शिवाजी राठोड, नितीन पवार, सुनील भारद्वाज हे अधिकारी आजारी असून, होम आयसोलेशनमध्ये आहेत. मुंबई पोलीस दलातील ४८६ अधिकारी, कर्मचारी ॲक्टिव्ह पेशंट असून, त्यातील १०४ जणांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. लसीचा पहिला डोस घेतलेल्या ६, दुसरा डोस घेतलेल्या ४१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, २५ पोलिसांना दुसऱ्यांदा लागण झाली आहे, तर आतापर्यंत १० हजारांच्यावर पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …