ठळक बातम्या

मुंबईकर श्रेयसची कसोटी पदार्पणातच बाजी

कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी झळकावले अर्धशतक
कानपूर – मुंबईकर श्रेयस अय्यरने कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी अर्धशतक झळकावले आहे. विशेष म्हणजे श्रेयसची ही पहिलीच कसोटी आहे. त्याने पदार्पणातील कसोटीमधील पहिल्याच इनिंगमध्ये अर्धशतक झळकावत टीम इंडियाचा प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविडचा विश्वास सार्थ ठरवला. कानपूरच्या ग्रीनपार्कवरील कसोटीच्या पहिल्या दिवशी लंचनंतर टीम इंडियाला दोन धक्के झटपट बसले. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा लंचनंतर लगेच परतले. त्यावेळी कसोटीच्या क्षणी श्रेयसने मैदानात पाऊल ठेवले. त्यानंतर श्रेयसने सुरुवातीला क र्णधार अजिंक्य रहाणे आणि नंतर रवींद्र जडेजा यांच्यासोबत महत्त्वाची भागीदारी करीत अर्धशतक झळकावले. श्रेयस अय्यरला सकाळी महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी कॅप दिली. त्याचबरोबर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतरच्या पहिल्याच कसोटीमध्ये श्रेयसला पदार्पणाची संधी मिळाली. दिग्गज खेळाडूंनी ठेवलेला विश्वास श्रेयसने सार्थ ठरवला. श्रेयसने ९४ चेंडूंमध्ये ६ चौकारांसह आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याचबरोबर त्याने रवींद्र जडेजासोबत पाचव्या विकेटसाठी महत्त्वाची भागादारी देखील केली. श्रेयस आणि जडेजाच्या भागीदारीमुळे टीम इंडियाने दोनशे धावांचा टप्पा देखील पार केला.
श्रेयसने आजवर ९२ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ५२.१६ च्या सरासरीने ४५९२ धावा काढल्या आहेत. यामध्ये १२ शतके आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे, तर २०२ हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे. टीम इंडियाची मिडल ऑर्डर हा इंग्लंड दौऱ्यात चिंतेचा विषय होता. मिडल ऑर्डरची ही चिंता दूर करण्यासाठी श्रेयसवर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी विश्वास दाखवला होता. तो विश्वास श्रेयसने पहिल्याच कसोटीमध्ये सार्थ ठरवला.
श्रेय्यस अय्यरने २०१७ मध्ये भारताकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने श्रीलंकेविरुद्ध धर्मशाला येथे पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. त्याचदरम्यान, श्रेयस अय्यर कसोटीमध्ये पदार्पण करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर त्याला मार्चमध्ये विराट कोहलीच्या दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार होते, परंतु अजिंक्य रहाणे अतिरिक्त गोलंदाज घेऊन मैदानात उतरला. श्रेयस अय्यरला पहिली कसोटी खेळण्यासाठी ४ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. त्या मालिकेपूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात नाबाद द्विशतक झळकावले होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …