मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा; कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली

मुंबई – मुंबईत गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढू लागली आहे. आता तर कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, बुधवारी ५०० च्या दिशेने सरकणारा आकडा गुरुवारी ६०२ वर गेला असल्याने ही मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा आहे. गुरुवारी ६०२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सध्या मुंबईची एकूण रुग्णसंख्या ७,६८,७५० झाली आहे. गुरुवारी २०७ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या ७,४६,९९१ झाली आहे. मृतांची संख्या १६,३६७ झाली आहे. मुंबईत सध्या २,८१३ सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के आहे. कोविड रुग्णवाढीचा दर ०.०४ टक्के असून, रुग्णदुपटीचा कालावधी १,७४७ दिवस असा आहे. गुरुवारच्या चाचण्या ३९,४२३ असून, आतापर्यंतच्या एकूण चाचण्या १,३३,३१,१४० झाल्या आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हळूहळू वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या दोन दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी तर तिने ६००चा टप्पा पार केला आहे. त्यामुळे मुंबईकरांना कोरोनाचा पुन्हा विळखा पडत आहेत की काय?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …