मी सिंगलच खूश आहे – अमिषा पटेल

बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आहे. नुकतेच तिने ३० डिसेंबर रोजी आपला जवळचा मित्र फैसल पटेल याला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिने ३० डिसेंबर रोजी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर फैसल खानसोबतचे अनेक फोटो शेअर केले होते. या फोटोंसोबत तिने एक खास पोस्टही लिहिली होती.
अमिषाने फैसल याला जन्मदिनाच्या शुभेच्छा देताना आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते,

‘जन्मदिनाच्या शुभेच्छा माझा डार्लिंग फैसल पटेल.’ त्यानंतर लगेचच हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली. आता यावर बाळगलेले आपले मौन अमिषाने तोडले आहे. त्याचबरोबर तिने फैसल पटेल सोबत आपले कसे रिलेशनशीप आहे हे देखील स्पष्ट केले आहे.
एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अमिषा पटेल म्हणाली, ‘हे खूप हैराण करणारे आहे. मी आणि फैसल एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतो. माझी त्याच्या बहिणीसोबतही मैत्री आहे. तो जो मेसेज होता ती केवळ एक मस्करी होती. यापेक्षा अधिक काही नाही. सिंगल आहे आणि सिंगलच खूश आहे. मला आता कोणत्याही रिलेशनशीपमध्ये इंटरेस्ट नाहीयं. फैसल एक असा व्यक्ती आहे ज्याला असे जोक्स क्रॅक करायला खूप आवडतात.

अमिषा पुढे म्हणाली, ‘आमची दोघांचीही राजकीय पार्श्वभूमी आहे. माझे आजोबा म्हणजे बॅरिस्टर रजनी पटेल यांनी भारताच्या माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत काम केले आहे, तर अहमद पटेल यांनी सोनिया गांधी यांच्यासोबत काम केले आहे. आमचे कुटुंब एकमेकांना तीन पिढ्यांपासून ओळखते. मी अहमद अंकलच्या खूप जवळची होती. फैसल आणि माझे अनेक मित्रही कॉमन आहेत. मला ठाऊक आहे की सध्या अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत, परंतु या रेसमध्ये दाखल होण्याचा माझा कोणताच इरादा नाहीयं. मी सिंगलच खूश आहे आणि मी आपल्या मर्जीने माझे काम करू शकतेयं. मला वाटते की रिलेशनशीपमध्ये असणे हे भावनात्मकदृष्ट्या
खूप थकवणारे काम आहे. सध्या माझ्याकडे या गोष्टींसाठी वेळ नाहीयं.’ फैसल पटेल हा दिवंगत राजनेते अहमद पटेल यांचा मुलगा आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …