ठळक बातम्या

मी रणबीर कपूर किंवा रणवीर सिंग नाहीयं

मी रणबीर कपूर किंवा रणवीर सिंग नाहीयं

गजराज राव यांच्या पत्नीने बधाई होच्या वेळेस दिली होती प्रतिक्रिया
सन २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला बधाई हो हा चित्रपट कुणाला बरे आठवत नसेल. नीना गुप्ता आणि गजराज रावसारख्या अभिनेत्यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने तिकीटबारीवर जोरदार कमाई केली होती. एका वेगळ्या कल्पनेवर आधारित हा चित्रपट चांगलाच हिट झाला होता, परंतु प्रत्यक्षात हा चित्रपट ज्या धर्तीवर बेतलेला होता त्याची भीती गजराज राव यांना अगदी चित्रपट प्रदशर््िात होईपर्यंत सतावत होती. त्यांनी ही भीती आपली पत्नीजवळ जेव्हा व्यक्त केली होती तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की ना तुम्ही रणबीर कपूर आहात आणि ना रणवीर सिंग. जरी या चित्रपटाने काही कामगिरी केली नाही, तरी तुमच्या करिअरमध्ये फारसा काही फरक पडणार नाही असे मत त्यांच्या पत्नीने व्यक्त केल्यानंतरच गजराज राव यांनी हा चित्रपट स्वीकारण्याचे ठरवले होते.

एका मुलाखतीत बोलताना गजराज राव म्हणाले की, बधाई हो या चित्रपटाने माझे आयुष्यच पुरते बदलून टाकले. दिग्दर्शक अमित शर्मा आणि मी एकमेकांना दोन दशकांपासून ओळखत आहोत. जेव्हा त्यांनी मला स्क्रिप्टबद्दल सांगितले तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझ्या मनात पहिला विचार आला ‘हे खरे आहे का?’ मला प्रत्यक्षात ही
आॅफर मिळत आहे का? हे खरेच आहे याची जाणीव होण्यापूर्वी…परंतु माझ्या भीतीने उचल खाल्ली आणि मी विचार केला की मी जितेंद्र कौशिक या व्यक्तीरेखेशी न्याय करू शकतो. कारण यापूर्वी मला इतकी मोठी भूमिका कधीच आॅफर झाली नव्हती. दरम्यान, गजराज राव यांनी जेव्हा या चित्रपटाच्या कन्सेप्टबद्दल आपल्या पत्नीला सांगितले आणि लोक आपली खिल्ली तर उडवणार नाहीत ना अशी भीती जेव्हा तिच्याजवळ व्यक्त केली होती तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की तुम्ही ना रणबीर कपूर आहात आणि ना रणवीर सिंग. जरी हा चित्रपट चालला नाही तरी तुमच्या करिअरवर आणि इमेजवर काही परिणाम होणार आहे. त्यानंतरच आपण पुढे जाण्याचा निर्णय घेतला, असेही गजराज राव यांनी सांगितले.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *