मी भाजपच्या पाठिंब्याने आमदार झालो

  • शिवसेना आमदारांनी व्यक्त केली खदखद

सोलापूर – या सरकारमध्ये आमचा कोणी विचार करत नाही, असे म्हणत शिवसेना आमदाराने पक्षाला घरचा आहेर दिला आहे. सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी एका सभेत पक्षाविरोधात नाराजी व्यक्त केली. राज्यातील मंत्रिमंडळात माढा लोकसभा मतदारसंघातील एकही मंत्री नाही. आमच्यापैकी कुणालाही मंत्रिमंडळात घेतले नाही, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच भाजपच्या पाठिंब्याने आपण आमदार झालो असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.
माझे सोडा शिवसेनेतून मी पहिल्यांदाच निवडून आलो आहे. त्यामुळे मला आधीच गडबड करायची नाही, लांब बसायचे म्हणून सांगण्यात आले; पण ३०-३० वर्षे निवडून आलेल्या बबनदादा शिंदे यांच्यासारख्या लोकांनाही संधी देण्यात येत नाही. आम्हाला नाही वाटत या सरकारमध्ये आम्हाला कोणी विचारत आहे, घरची कोंबडी डाळ बरोबर, अशी आम्हा सगळ्यांची अवस्था झाली आहे. गप्प बसायचे नाही, तर गावाकडे जायचे, एवढेच उरले आहे, असे म्हणत शहाजी पाटलांनी पक्षाला घरचा आहेर दिला. दरम्यान, त्यांचा मतदारसंघ असलेल्या सांगोला तालुक्यात शिवसेनेची केवळ ११०० मते असूनही मी भाजपच्या पाठिंब्यामुळे आमदार झालो, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. खासदार रणजित निंबाळकर यांच्यामुळे पुन्हा आपल्याला आमदारकी मिळाली. या निवडणुकीत भाजपचे माझ्यावर सतत लक्ष होते. अडचण आहे का? असे विचारायला त्यांचे फोन यायचे, असेही त्यांनी सांगितले. तब्बल १८ वर्षांनंतर पुन्हा आमदारकी मिळताना भाजपसोबतच राष्ट्रवादी आणि शेकाप यांचाही छुपा पाठिंबा मिळाला, असे ते म्हणाले. तर या महाविकास आघाडी सरकारमध्ये आमचा कोणी विचार करेल, असे वाटत नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …