मी तुम्हाला हिंदू म्हणजे काय सांगतो – राहुल गांधी

अमेठी – गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या हिंदू आणि हिंदुत्व या शब्दांवरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. हिंदू आणि हिंदुत्व वेगवेगळे आहेत की, एकच आहेत, यावर वाद सुरू आहे. यासंदर्भात शनिवारी राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या अमेठीमध्ये घेतलेल्या सभेत स्पष्टीकरण दिले. तसेच, या मुद्यावरून भाजपवर परखड टीका करतानाच महात्मा गांधींना हिंदू असल्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हटले आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या भगिनी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधीदेखील होत्या.
मी तुम्हाला हिंदू म्हणजे काय ते सांगतो. हिंदू म्हणजे अशी व्यक्ती, जी फक्त सत्याच्या मार्गावर मार्गक्रमण करते, जी व्यक्ती कधीच घाबरत नाही, निडर असते आणि जी व्यक्ती कधीच तिच्या भीतीचे रूपांतर हिंसा किंवा द्वेष किंवा रागात करत नाही. त्याचे सर्वोत्तम उदाहरण महात्मा गांधी आहेत, असे राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी राहुल गांधी यांनी हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यातला त्यांना अपेक्षित असलेला फरकदेखील स्पष्ट केला. महात्मा गांधींनी त्यांचे पूर्ण आयुष्य सत्य समजून घेण्यात घालवले, तर दुसरीकडे गोडसे हा हिंदुत्ववादी होता. गोडसेला कुणीही महात्मा म्हणत नाही, कारण त्याने एका अशा हिंदूची हत्या केली, जे नेहमी सत्य बोलायचे. गोडसे हा घाबरट होता. एक कमकुवत माणूस होता. तो त्याच्या भीतीचा सामना करू शकला नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …