मीरा राजपूतला पाहून युजर्सना लागला झटका

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत ही सोशल मिडियावर नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असते. मीरा भलेही बॉलीवूडची अभिनेत्री नसेल परंतु तिची फॅन फॉलोइंग आणि लोकप्रियता ही एखाद्या अभिनेत्रीपेक्षा काही कमी नाहीयं. लोक मीराच्या सोशल मिडिया पोस्टवर आपली पसंतीही दर्शवत असतात. परंतु नुकताच मीराने आपला असा काही फोटो शेअर केला आहे जो पाहून युजर्स तिची खिल्ली उडवत आहेत.
खरेतर मीराचा हा फोटो खूप सिम्पल सोबर आहे. या फोटोत मीरा एका भिंतीसमोर उभी असून तिने जांभळ्या रंगाचा जंप सुट घातलेला आहे. यात ती खूप कुल दिसत आहे. या आऊटफिटसोबत मीराने आपल्या खांद्यावर पिवळ्या रंगाची बॅग अडकवली आहे. या फोटोत मीरा नेहमी सारखीच खूप चांगली वाटत आहे. परंतु जेव्हा तिच्या पायाकडे लक्ष जाते तेव्हा ते पाय खूप विसंगत वाटतात. या फोटोत मीराचे पाय इतके विचित्र दिसत आहेत की लोकांना विश्वासच बसत नाहीयं की ते मीराचे पाय आहेत. त्यामुळे त्यांनी मीराला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. फोटोत मीराचे पाय एकदम पातळ दिसत असून त्यांचा रंगही तिच्या चेहऱ्याच्या तसेच हातांच्या रंगापेक्षा डार्क आहे. त्यामुळे या फोटो एडिट केला असावा असेच वाटतेयं. त्यामुळे लोकांना आयतीच संधी मिळालीय मीराला ट्रोल करण्याची तर ते थोडीच ही संधी सोडणार आहेत? एका युजरने म्हटले आहे की ‘ पायांना क्रॉप करायचे होते किंवा फेशियल करायचे होते.’

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …