ठळक बातम्या

मिल्नेला भारतविरुद्ध चांगल्या कामगिरीची अपेक्षा

दुबई – जायबंद लॉकी फर्ग्युसनच्या स्थानी संघात समाविष्ट करण्यात आलेला न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज एडम मिल्नेला अपेक्षा आहे की, आयसीसी टी-२० विश्वचषकात रविवारी भारतविरुद्ध आपल्या लयाचा फायदा घेताना अंतर निर्माण करण्यास यशस्वी राहतील.

मिल्नेल संघात राखीव खेळाडूच्या रूपात समाविष्ट होता, पण फर्ग्युसनला झालेल्या दुखापतीनंतर त्याला मुख्य संघात जागा मिळाली. तो मंगळवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अंतिम संघात समाविष्ट होणार होता, पण मैदानात पोहचल्यावर कळले की, आयसीसीने अद्याप त्याला जायबंद खेळाडूच्या जागी समाविष्ट करण्यासाठी परवानगी दिलेली नाही. पत्रकारांशी संवाद साधताना मिल्ने म्हणाला, हो, मला निश्चित रूपात वाटते की, हा माझ्यासाठी खूप चांगला दौरा राहिला. बिग बॅश लिग, विटॅलिटी ब्लास्ट व द हंड्रेड सारख्या छोट्या फॉरमेटच्या फ्रँचायजी आधारित स्पर्धांत लयात गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणाला की, मी या लयाचा जास्तीत जास्त फायदा घेऊ इच्छितो व यावेळी चांगली कामगिरी करणे व त्यात सुधारणा करू पाहिन. मी येथे चांगली कामगिरी करण्यास उत्साहात आहे. हा २९ वर्षीय गोलंदाज नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग होता. त्याचे मत आहे की, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मी खेळलो असतो तर संघाची कामगिरी आणखीन चांगली झाली असती. न्यूझीलंड संघाला येथे पाच विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. तो म्हणतो, आयपीएलदरम्यान ज्याप्रकारच्या खेळपट्ट्या होत्या, ते पाहता वेगवान गोलंदाजांना असमान उसळी मिळत होती व त्यामुळे फलंदाजांना अडचणीचा सामना करावा लागला. माझ्या असण्याने एखाद्यावेळेस संघ थोडा बळकट होईल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …