माशांचा मारा करणारी अनोखी तोफ

तुम्ही चित्रपटांमध्ये किंवा इंटरनेटवर सैन्याने वापरलेला तोफखाना पाहिला असेल, ज्यामध्ये सैनिक बाहेरून गोळीबार करतात आणि दूरवर बसलेल्या शत्रूच्या बंकरला लक्ष्य करतात; पण आज आम्ही तुम्हाला अशा तोफेबद्दल सांगणार आहोत ज्यातून दारूगोळा डागला जात नाही, तर चक्क मासे डागले जातात. अर्थात हे आश्चर्यकारक आहे, कारण लोक नेहमी म्हणतात की, जिवंत मासे यांना तोफेच्या आत गुदमरल्यासारखे होणार नाही का?
अमेरिकन कंपनी हूश इनोव्हेशन्सने २०१३ मध्ये एका तंत्रज्ञानाचा शोध लावला ज्याद्वारे त्यांनी मासे वाचवण्याची मोहीम सुरू केली. कंपनीने असे तंत्रज्ञान तयार केले आहे, ज्याद्वारे ती एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी मासे पाठवू शकते. कंपनीच्या वेबसाइटनुसार, सॅल्मन, ईल, लॅम्प्रे, स्टर्जनसारखे अनेक मासे त्यांचे नवीन वातावरण आणि निवासस्थान शोधण्यासाठी दरवर्षी हजारो मैल एका जलस्रोतातून दुसºया जलस्रोतापर्यंत जातात, मात्र वातावरणातील बदलामुळे या माशांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासापासून वंचित रहावे लागते आणि स्थलांतर अवघड होते. नद्यांवर बांधली जाणारी धरणे हे त्याचे प्रमुख कारण आहे.

या समस्येवर मात करण्यासाठी हूश कंपनीने फिश तोफ तयार केली आहे. द गार्डियन वेबसाइटच्या अहवालानुसार, हूश पॅसेज पोर्टल ही एक अशी प्रणाली आहे जी पाण्याच्या एका भागातून दुसºया भागात मासे वाहून नेण्यात मदत करते. यात प्रामुख्याने धरणाच्या पलीकडे मासे वाहून नेले जाते. जेव्हा हे तंत्रज्ञान आले, तेव्हा दलातील कर्मचारी मासे हाताने पकडून तोफेत टाकायचे आणि त्यांना त्यांच्या स्थलांतराचा आवश्यक प्रवास पूर्ण करता यावा म्हणून दुसºया ठिकाणी नेले जायचे, पण आता तंत्रज्ञान खूप बदलले आहे आणि मासे स्वत: त्यात प्रवेश करतात आणि दुसºया भागात पोहोचतात.
तोफेला एक लांबलचक एअर-लॉक ट्यूब जोडलेली असते, ज्यामध्ये माशांना साजेसा दबाव निर्माण केला जातो, ज्यामुळे त्यांना बळासह दुसºया ठिकाणी पाठवता येते. माशांच्या दृष्टीकोनातून बोलायचे झाले, तर पाइपमध्ये पाणी भरले आणि त्यात गेल्याने माशांना नदीतच पोहल्यासारखे वाटते. पाण्याचा प्रवाह त्यांना दुसºया ठिकाणी घेऊन जातो. पलीकडे मासा बाहेर येताच पोहत बाहेर निघून जातो. रिपोर्टनुसार ही यंत्रणा कोलंबिया नदीवर बसवण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे एका वर्षात १५ हजार मासे एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी पाठवले जातात.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …