मालमत्ता कर माफीवरुन काँग्रेस नेत्याकडूनही सरकारला घरचा आहेर; भाजप आक्रमक

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी मुंबई महानगर पालिका हद्दीतील ५०० स्क्वेअर फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांसाठी मालमत्ता कर माफ केला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मुंबईला दिलेला न्याय तेअन्य महानगगर पालिकांना का लागू करत नाही असा प्रश्न विचारत काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. मुंबईमधील अल्प मध्यम वर्गीय व मध्यमवर्गीय कुटुंबियांना दिलासा देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह आहे, मात्र नागपुरातही असे हजारो कुटुंब आहे ज्यांना अशाच निर्णयाची अपेक्षा आहे. मुख्यमंर्त्यांनी नागपूरकरांना ही दिलासा द्यावा अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे. गेल्या काही वर्षात नागपूर शहरात आजूबाजूच्या ग्रामीण भागातून हजारो कुटुंब नागपुरात स्थायिक झाले आहे. त्या सर्वांचे घर 500 वर्ग फूट पेक्षा कमी आकाराचे असून त्यांना मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा अशी आशिष देशमुख यांनी मुख्यमंर्त्यांना पत्र पाठवून अशी मागणी केली आहे.

या निर्णयाला एवढा उशीर का झाला? – शेलार
आतापासूनच नव्हे तर वचन दिलेत त्या तारखे पासून 500चौरस फुट घरांचा मालमत्ता कर पुर्ण माफ करा अशी मागणी करीत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी, आता सत्तेची खुर्चीडळमळीत झाली म्हणून शिवसेनेला मुंबई’करां’ची आठवण झाली असा टोलाही लगावला आहे. मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात येत असल्याची घोषणा सरकारनेकेली आहे. या निर्णयाला एवढा उशीर का झाला? गेली चार वर्षे का निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आतापासून नको तर मागिल चार वर्षांचा कर ही मुंबईकरांना परत करा. जेव्हा वचन दिलेत तेव्हा पासूनची करमाफी करा अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
सरकार हे संपूर्ण राज्यासाठी असते. सरकार फक्त मुंबई महानगरपालिकेची नसते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री असून त्यांनी मुंबईच्या नागरिकांना मालमत्ता करातून दिलेली माफी राज्यातील इतर महानगरपालिकांसाठी ही लागू करावी अशी मागणी भाजपने केली आहे. जे न्याय मुंबई महानगरपालिकेतील 500 वर्ग फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांसाठी करण्यात आला आहे. तोच न्याय नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, पिंपरी चिंचवड अशा इतर महानगरपालिकांसाठी ही करण्यात यावा अशी मागणी भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांनी केली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …