मालगाडीचे कपलिंक तुटल्याने रेल्वे वाहतूक ३ तास खोळंबली

शहापूर – मध्य रेल्वेच्या आटगाव-आसनगाव दरम्यान अप मार्गावरून धावणाºया मालगाडीचे कपलिंग तुटल्याने रेल्वे वाहतूक तब्बल ३ तास ठप्प झाली. यामुळे अप व डाऊन मार्गावरील चार लोकल रद्द करण्यात आल्या, तर लांबपल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत होत्या. रविवारी सकाळी ९ च्या सुमारास झालेल्या या प्रकारामुळे संतप्त चाकरमानी प्रवाशांनी आसनगाव स्थानकावर काही काळ गोंधळ घातला. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईला जाणारी महानगरी एक्सप्रेस डाऊन मार्गावरून काढून आसनगाव स्थानकावर थांबविण्यात आली. दरम्यान, मालगाडीच्या कपलिंगची दुरुस्ती केल्यानंतर १२च्या सुमारास रेल्वे वाहतूक सुरू झाली. मात्र यामुळे सायंकाळपर्यंत वेळापत्रक कोलमडले होते.
मध्य रेल्वेच्या आटगाव-आसनगाव स्थानकादरम्यान किमी क्रमांक ९१/६ याठिकाणी आज सकाळी ९च्या सुमारास अप मार्गावरून धावणाºया मालगाडीच्या एका डब्याची कपलिंग तुटली. यामुळे अप मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आटगाव येथून इंजिन तसेच आटगाव, खर्डी व कसारा येथून कामगार वर्ग उपलब्ध झाल्यानंतर कपलिंग बदलण्यात आली. त्यानंतर दुपारी १२च्या सुमारास रेल्वे वाहतूक सुरू झाली. या दरम्यान अप व डाऊन मार्गावरील प्रत्येकी दोन अशा चार लोकल रद्द करण्यात आल्याने चाकरमानी प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात गोंधळ घातला. स्टेशन मास्तरला घेराव घालून एक्सप्रेस थांबवा अन्यथा कार्यालयाची तोडफोड करण्याचा इशारा दिला. यावर आसनगावला येणारी लोकल वासिंद येथूनच सीएसटीला रवाना न करता आसनगावपर्यंत आणण्याबाबत नियंत्रण कक्षाला आसनगाव स्थानकावरून कळविण्यात आले होते. मात्र नियंत्रण कक्षाकडून याकडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष करण्यात आल्याने प्रवाशांनी आसनगाव स्थानकावर गोंधळ घातला. अखेर प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटीला जाणारी महानगरी एक्सप्रेस डाऊन मार्गावरून काढून आसनगाव स्थानकावर थांबविण्यात आल्यानंतर प्रवाशी शांत झाले. या दरम्यान, डाऊन मार्गावरील आसनगाव व कसारा या दोन लोकल तर आसनगाव व कसारा येथून सीएसटीकडे जाणाºया दोन लोकल रद्द करण्यात आल्या. तर सीएसटीकडे जाणाºया महानगरी, राजधानी, गरीबरथ, हावडा या लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट एक्सप्रेस सुमारे २ तास उशिराने धावत होत्या

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …