गृहमंत्रालायाकडून आकडेवारी जाहीर
नवी दिल्ली/लखनऊ – मानवी हक्क उल्लंघनाची ताजी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत दिली आहे. त्यात काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये देशात सर्वात जास्त मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याची माहिती त्यातून समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही अनेकदा सवाल उपस्थित केले जातात. योगी आदित्यनाथ राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर काही कठोर निर्णय घेण्यात आले, मात्र तरीही राज्यात मानवी हक्कांचे उल्लंघन जास्त होत आहे. देशातील मानवी हक्क उल्लंघनाच्या एकूण तक्रारींपैकी ४० टक्के तक्रारी एकट्या उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या ३ वर्षांतील आकडेवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी जाहीर केली आहे. त्यात ही बाब समोर आली आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांकडून विद्यार्थी, पत्रकार, मानवी हक्कांचे संरक्षण करणाऱ्यांना अटक करून तुरुंगात टाकल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यावेळी आरोपांची पडताळणी न करता ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तुरुंगातील गर्दी कमी करण्याचे न्यायालयाचे निर्देश असतानाही, सरकारविरोधात बोलणाऱ्या अनेकांना तुरुंगात डांबण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच बहुसंख्य लोक ांना नजरकैदेत ठेवल्याचाही आरोप आहे. सीएए (नागरिकत्व सुधारणा कायदा) विरोधात आंदोलन केलेल्या आंदोलकांना अटक केल्याच्या घटनाही उत्तर प्रदेशात जास्त घडल्या आहेत. तसेच या अहवालात आणखी एक बाब समोर आली आहे ती म्हणजे, सहमतीने आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांना अटक केल्याच्या घटनाही उत्तर प्रदेशात घडल्या आहेत. त्यामुळे हा अहवाल उत्तर प्रदेशसह देशाची चिंता वाढवणारा आहे.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …