ठळक बातम्या

माधवन घेऊन आलाय आणखी एक भावनात्मक कथा

 

पॅन इंडियन स्टार आर. माधवन पुन्हा एकदा डिजिटल मनोरंजन जगतात दाखल होत आहे. यावेळेस तो आपल्या जगभरातील चाहत्यांना हसविण्यास येत आहे.

‘तनु वेड्स मनु’सारख्या हिंदी सिनेमाच्या हिट कॉमेडी फ्रेंचाईजीच्या दुसऱ्या चित्रपटानंतर आता आर. माधवन पुन्हा एकदा कॉमेडी ड्रामा घेऊन येत आहे. माधवन हा देशात वेबसीरिज काळ सुरू करणाऱ्या
कलाकारांपैकी एक मानला जातो. त्याची प्राईम व्हिडीओवर प्रसारित झालेली वेबसीरिज ‘ब्रीद’ ही जगभरामध्ये सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या वेबसीरिजपैकी एक आहे. आता तो नेटफ्लिक्सवर ‘डिकपल्ड’ या

वेबसीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. या सीरिजमध्ये त्याच्या पत्नीच्या व्यक्तिरेखेत सुरवीन चावला पाहायला मिळणार आहे.
‘डिकपल्ड’मध्ये एका अशा जोडप्याची कथा आहे, ज्यांचे वैचारिक मतभेद त्यांना एकत्र राहून देत नाही आणि त्यांचे नाते असे आहे की, ते वेगळे होण्याबाबतही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. लेखक मनु जोसेफ लिखित वेबसीरिज ‘डिकपल्ड’ची कथा दिल्लीजवळील गुरुग्राममधील एका दाम्पत्याची कथा आहे. ही सीरिज येत्या १७ डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. बुधवारी या सीरिजची पहिली झलक समोर आली, ज्यात पाहायला मिळते की हे दाम्पत्य आपल्या वैवाहिक आयुष्याच्या निर्णायक टप्प्यातून जात आहे. या सीरिजचा ट्रेलर खूपच मनोरंजक बनला असून, हा ट्रेलर पाहिल्यानंतर माधवनच्या चाहत्यांमधील उत्सुकता नक्कीच शिगेला पोहोचली असणार.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …