ठळक बातम्या

माझ्या पराभवासाठी शिवेंद्रसिंहराजेच जबाबदार – शशिकांत शिंदे

मुंबई – सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामुळेच माझा पराभव झाला. पक्षश्रेष्ठींनी दिलेले उमेदवार पराभूत झाले. त्यांना सहकार्य करणाºया पॅनलच्या प्रमुखांनी माझ्या पराभवावर कोणताही खुलासा केला नाही, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे, तसेच माझ्या पराभवामागे त्यांचेच षड्यंत्र आहे, असा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला. जिल्हा बँकेतील पराभवानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी गुरुवारी सातारा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. आपली भूमिका जाहीर केली, यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली.
शशिकांत शिंदे म्हणाले, सर्वांनी एकत्र बसून बँकेच्या निवडणुकीची व्यूहरचना केली होती. सर्वजण एकत्र काम करत असताना आतून एक आणि बाहेरून एक असे करण्याची गरज नव्हती. मला थांबायला सांगितले असते, तर मी थांबलो असतो. जे शेवटपर्यंत मी निवडून येणार असे सांगत फिरत होते, त्यांनी व पॅनल प्रमुखांनी एकत्र बैठक शेवटपर्यंत का लावली नाही. मी काय उपरा नव्हतो. जो आमदार अथवा ज्येष्ठ कार्यकर्ता ज्या मतदारसंघाच्या भागातील आहे, त्याने तो भाग बघायचा असे आमच्यात ठरलेले असताना त्यांना पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मतदारसंघ दिला, तेव्हा ही मी जावलीतील होतो. त्यांनी माझ्याशी किमान चर्चा तर करायची. एकाच दिवसात सगळे अर्ज निघाले आणि हे बिनविरोध कसे झाले हे शोधले पाहिजे, असे सांगून आमदार शिंदे म्हणाले, शिवेंद्रसिंहराजेंविषयी पक्षाने भूमिका जाहीर करावी, मी सरळपणाने निवडणूक लढवली, कोणतीही दादागिरी केली नाही. सातारा विधानसभा लढविणार का? या प्रश्नावर मी सध्या विधान परिषदेवर आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादीचे नऊ आमदार कसे होतील यासाठी प्रयत्न करणार आहे. येणाºया काळात होणाºया निवडणुकीत पक्षाचा बालेकिल्ला अभेद्य राहावा, यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निर्णय घ्यावा. याचबरोबर बँकेच्या निवडणुकीत ज्या दिवशी माझा पराभव झाला, त्याच दिवशी माझ्याविरोधात कट करस्थान करणारे नाचले, हे सर्वांनी पाहिलेय.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …