माजी विद्यार्थी पराग अग्रवाल यांना आयआयटी मुंबईच्या शुभेच्छा

  •  पराग ट्विटरचे नवे सीईओ

मुंबई – भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईने आपला माजी विद्यार्थी पराग अग्रवाल यांना मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)च्या रूपात पदोन्नती मिळाल्याबाबत मंगळवारी शुभेच्छा दिल्या.
संस्थेने ट्विट केले की, आमच्या संस्थेतील माजी विद्यार्थी डॉ. पराग यांना ट्विटरचे नवे सीईओ नियुक्त केल्याबाबत असंख्य शुभेच्छा. डॉ. पराग यांनी २००५ मध्ये आयआयटी मुंबईमधून कॉम्प्युटर सायन्स व इंजिनिअरिंगमध्ये बीटेक डिग्री मिळवली होती. त्यांनी २०११ पासून ट्विटरसाठी काम करण्यास सुरुवात केली व २०१७ साली त्यांची सीटीओ म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुंबईत जन्मलेल्या पराग यांच्या आई सेवानिवृत्त शालेय शिक्षिका आहेत. त्यांचे वडील आण्विक ऊर्जा क्षेत्रात कार्यरत होते व तेदेखील वरिष्ठ पदांवर राहिलेत. पराग (३७) यांनी मुंबईच्या एटॉमिक एनर्जी सेंट्रल शाळेतून शिक्षण पूर्ण केले. २००५ नंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले. २०११ साली त्यांनी तेथील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पीएचडी करताना ट्विटरसोबत काम करण्यास सुरुवात केले. ट्विटरचे मावळते सीईओ डोरसी यांनी सोमवारी घोषणा केली की, पराग अग्रवाल हे कंपनीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. डोरसी यांनी या कंपनीतील १६ वर्षांनंतर आपल्या सीईओ पदाचा राजीनामा दिला. ते या कंपनीचे सहसंस्थापकदेखील आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …