माजी नगरसेवकाच्या भावाच्या गाडीत सापडल्या नशेच्या गोळ्या

औरंगाबाद – शहरातील माजी नगरसेवक सय्यद मतीन यांच्या भावाची गाडी घेऊन जाणाऱ्या एका इसमाकडे नशेच्या तब्बल २६० गोळ्या (बटण) आढळून आल्या. गुरुवारी शहरातील सिटी चौक पोलिसांनी अण्णा भाऊ साठे चौकात रात्री साठेआठ वाजता ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी सय्यद मंजूर या आरोपीला अटक केली आहे.

आरोपी कारमधून नशेच्या गोळ्या घेऊन जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना गुरुवारी मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे, अंमलदार देशराज मोरे यांच्या पथकाने अण्णा भाऊ साठे चौकात सापळा रचून गाडी अडवली. सय्यद मंजूरची तपासणी केली असता, १३ स्ट्रीपमध्ये २६० गोळ्या आढळून आल्या. अधिक माहिती घेतली असता आरोपी मंजूरकडे असलेली चारचाकी माजी नगरसेवक सय्यद मतीन यांचे भाऊ सय्यद यांची असल्याचे समोर आले. मंजूरकडे त्यांची गाडी कशी आली, नशेच्या गोळ्यांसाठी त्याने ती का वापरली, कुणाच्या सांगण्यावरून वापरली, यात आणखी कुणाचा सहभाग आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत. चौकशीत जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …