मांढरदेव येथील काळेश्वरी देवी यात्रा रद्द

जमावबंदी आदेश लागू

सातारा – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व यात्रेच्या निमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेता वाई तालुक्यातील काळेश्वरी देवी (मांढरदेव) व दावजी बुवा (सुरूर) या यात्रा आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे. या यात्रेनिमित्त प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी १० जानेवारी ते १ फेब्रुवारी, २०२२ या कालावधीत जमावबंदी आदेश लागू केले आहेत.
तालुक्यातील मांढरदेव येथील काळेश्वरी देवीची आणि सुरूर येथील दावजी बुवाची वार्षिक यात्रा येत्या १६ ते १८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेली. या यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र राज्यातील लाखो भाविक दरवर्षी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. यात्रेचा मुख्य दिवस शाकंभरी पोर्णिमेला (दि. १७ जानेवारी) आहे. या दिवशी, तसेच प्रत्येक मंगळवार, शुक्रवार या देवीच्या वारी आणि अमावस्या, पोर्णिमेला अशी यात्रेपूर्वी १५ दिवस आणि यात्रेनंतर १५ दिवस याठिकाणी भाविकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाईचे प्रांताधिकारी यांनी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार काळुबाई देवी यात्रा, मांढरदेव, ता. वाई व दावजी बुवा यात्रा, सुरूर यात्रा आयोजित करण्यास मनाई करण्यात येत आहे, तसेच कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही अशा धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येऊ नये. यात्रेतील धार्मिक कार्यक्रम मंदिराचे पुजारी व ट्रस्टचे सदस्य यांनीच पार पाडावी. त्याव्यतिरिक्त इतर व्यक्तींना कार्यक्रमास उपस्थित राहण्यास मनाई असेल, तसेच यात्रा कालावधीत ट्रस्टी व पुजारी वगळून इतर व्यक्तींना दर्शनासाठी बंदी असेल. यात्रा कालावधीत भाविकांना, तसेच स्थानिकांना रहिवासासाठी तंबू उभारण्यास तसेच पशू व पक्षी यांचा बळी देण्यास मनाई करण्यात आली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …