ठळक बातम्या

महिलेने स्वत:च रचले अपहरणाचे नाटक

स्पेनमधील एका महिलेने तिच्या जुगाराच्या व्यसनामुळे आश्चर्यकारक नाटक तयार केले. महिलेने रुग्णालयात पडलेल्या पतीला असे इमोशनल ब्लॅकमेल केले की, त्याच्याकडून लाखो रुपये काढून घेतले. बिचारा नवरा आपल्या लबाड बायकोच्या बोलण्यात अडकला आणि मूर्ख बनला. पत्नीला जुगाराचे व्यसन होते आणि पती घरात नसल्याचा फायदा घेत पत्नीने स्वत:चे अपहरण आणि खंडणीच्या पैशांनी बिंगो कार्ड खरेदी करण्याचे जबरदस्त नाटक रचले हे पतीलाही कळले नाही.
जुगाराचे व्यसन कोणत्याही गोष्टीचे असते, जेव्हा ते मर्यादा ओलांडते, तेव्हा माणूस स्वत:चे चांगले किंवा वाईट विचार करू शकत नाही. स्पेनमध्ये राहणाºया एका महिलेला देखील असेच व्यसन होते, ते म्हणजे जुगाराचे. या महिलेला बिंगो कार्ड खेळण्याची इतकी सवय झाली होती की, तिने स्वत:च पैशांसाठी स्वत:च्या अपहरणाचे नाटक रचले.

तिचा नवरा रुग्णालयात दाखल असताना, तिने हे नाटकदेखील तयार केले. घरात नसल्यामुळे, तिच्या पतीला तिच्या या वाईट मनसुब्याची जराही कल्पना नव्हती. त्याचवेळी पत्नीने पतीला मेसेज पाठवून पत्नीच्या सुटकेसाठी ५ लाखांची खंडणी मागितली. निष्पाप पतीनेही पत्नीचे प्रत्यक्षात अपहरण झाले आहे की नाही, हे न पाहता अपहरणकत्यार्ला ही रक्कम दिली.
४७ वर्षीय पत्नीचे नाटक जबरदस्त होते. तिने काही लोकांनी तिचे अपहरण केल्याचे भासवण्यासाठी आणि तिच्या सुटकेच्या बदल्यात ते सुमारे ५ लाख रुपयांची मागणी करत असल्याचे भासवण्यासाठी तिने फोनवर तिच्या पतीला सांगितले. पैसे मिळाल्यानंतर खंडणीचे पैसे दिल्यानंतर ही महिला बिंगो कार्डसह बिंगो हॉलमध्ये शिरताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी तिला पकडले, तेव्हा ही महिला बादलोना येथील कॅसिनोमध्ये उपस्थित होती.

महिलेच्या पतीने अपहरणकर्त्यांना पैसे दिले; मात्र या अपहरणाची माहिती पोलिसांना दिली. अपहरणकर्त्यांशी कसे वागावे याविषयी महिलेने तिच्या पतीला मेसेज ज्या क्रमांकावरून पाठवले होते, त्या क्रमांकाचा पोलिसांनी शोध घेतला. पोलिसांना या प्रकरणात काही तरी विचित्र आढळून आल्यावर त्यांनी महिलेच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आणि हे संपूर्ण प्रकरण नवºयाच्याही समोर आले. सध्या महिलेची जामिनावर सुटका झाली असली, तरी खटल्याची सुनावणी सुरू राहणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …