इंग्लंडच्या वेस्ट यॉर्कशायरमध्ये राहणाºया एका महिलेने तिचे भयानक फोटो शेअर केले आहेत. जेसिका शॅनन नावाच्या या महिलेने पार्टीपूर्वी डोळ्यांवर बनावट पापण्या चिकटवल्या होत्या. फेक आयलॅशेसच्या रिअॅक्शननंतर महिलेचे डोळे गंभीरपणे सुजले.
आजच्या काळात प्रत्येक स्त्री सुंदर दिसण्यासाठी विविध प्रकारच्या कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर करते, परंतु यापैकी अनेक उत्पादने त्वचा आणि शरीरासाठी चांगल्या नसतात. यामुळेच कोणतेही ब्युटी प्रोडक्ट वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे गरजेचे आहे. पॅच टेस्ट म्हणजे शरीराच्या एका लहान भागावर उत्पादन लागू करणे हे पाहण्यासाठी की, त्यामुळे काही प्रतिक्रिया होत आहे का; पण सहसा फार कमी लोकांना याची काळजी असते. इंग्लंडमध्ये राहणारी जेसिका अशाच एका ब्युटी प्रोडक्टच्या रिअॅक्शनची बळी ठरली.
जेसिकाने तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर जाताना चांगले कपडे घातले. खूप सुंदर दिसण्यासाठी तिने तिच्या पापण्या मोठ्या करण्याचा विचार केला. त्यासाठी तिने डोळ्यांना बनावट पापण्या चिकटवल्या. पार्टीतून परतल्यानंतर तिला झोप लागली; पण त्यानंतर तिच्या डोळ्यात तीव्र वेदना होऊ लागल्या. तिने स्वत:ला आरशात पाहिल्यावर तिला ओळखता येईना. पापण्यांवर फेव्हिकोल लागल्याने जेसिकाचे डोळे सुजले होते. तिचा संपूर्ण चेहरा सुजला होता. जणू तिच्या चेहºयावर कोणीतरी ठोसा मारला होता.
जेसिकाने सांगितले की, तिला तिच्या बनावट रशियन पापण्यांची अॅलर्जी आहे. तिने हे यापूर्वीही वापरले होते; पण त्यावेळी तशी वाईट प्रतिक्रिया झाली नव्हती; पण नुकतेच तिने पुन्हा कृत्रिम पापण्या वापरल्या, तेव्हा तिचे डोळे फारच सुजले. २५ वर्षीय जेसिकाचे डोळेही उघडू शकले नाहीत. फेव्हिकोल लागल्याने तिचे डोळे एकत्र अडकले होते.
डोळ्यांची अशी अवस्था पाहून जेसिका हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तेथे तिला कॉर्नियल अॅब्रेशन झाल्याचे सांगण्यात आले. सुमारे आठवडाभर औषधे घेतल्यानंतर तिचा त्रास कमी झाला. पापण्यांना चिकटवण्यासाठी वापरल्या जाणाºया द्रवामुळे तिला अशी प्रतिक्रिया आली होती. इ’ङ्म६’३.िूङ्मे च्या अहवालानुसार, रशियन कृत्रिम पापण्या अतिशय उत्कृष्ट आहेत; पण ते लागू करण्याच्या प्रक्रियेत जेसिकाच्या डोळ्यात संसर्ग झाला. रात्री खाज सुटल्यानंतर सकाळी तिचा चेहरा सुजला होता. सुरुवातीला तिने जवळच्या मेडिकल शॉपचे आयड्रॉप्स वापरले; पण त्यानंतरही जळजळ कमी झाली नाही, तेव्हा तिने डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला. जेसिकाची प्रकृती पाहिल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, अजून थोडा वेळ गेला असता, तर कदाचित तिची दृष्टी गेली असती; मात्र सुदैवाने जेसिकावर वेळीच उपचार झाले.