महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला; पण वेगवेगळ्या वर्षांत

कोणत्याही पती-पत्नीसाठी पालक होण्याचा अनुभव खूप वेगळा आणि आनंदाने भरलेला असतो. जेव्हा एखादी आई आपल्या मुलाला पहिल्यांदा छातीशी धरते आणि जेव्हा वडील पहिल्यांदा आपल्या मुलाला आपल्या मांडीवर घेतो, तेव्हा तो क्षण त्याच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण असतो. जुळ्या मुलांना जन्म देणाºया आईसाठी हा क्षण दोनदा येतो; पण अलीकडेच एका महिलेसोबत एक विचित्र अनुभव आला. तिने जुळ्या मुलांना जन्म दिला; पण दोघांचा जन्म वेगवेगळ्या वर्षी झाला.
अमेरिकेतील मॉन्टेरी काऊंटीमध्ये एक अशी घटना समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. फातिमा माद्रिगल आणि त्यांचे पती रॉबर्ट यांनी नुकतेच येथील नाटीविदाद मेडिकल सेंटरमध्ये त्यांच्या जुळ्या मुलांचे स्वागत केले, परंतु दोघांचा जन्म वेगवेगळ्या वर्षांत झाला. आता तुम्ही विचार कराल की, हे कसे शक्य आहे. जुळ्या म्हणजे फक्त तीच मुले जी एकत्र जन्माला येतात.

वास्तविक, फातिमाला जुळी मुले जन्माला येणार होती. त्यांचा मुलगा अल्फ्रेडोचा जन्म ३१ डिसेंबर, २०२१ रोजी रात्री ११:४५ वाजता झाला आणि त्याचे वजन सुमारे ३ किलो होते. त्यांच्या मुलीचा जन्म १२:०१ च्या सुमारास झाला. तिचे वजनही ३ किलोच्या जवळपास होते. अशाप्रकारे १५ मिनिटांनी १ जानेवारी, २०२२ रोजी मुलीचा जन्म झाला. अवघ्या १५ मिनिटांच्या उशिराने वेगवेगळ्या वर्षांत जुळी मुलं जन्माला आल्याच्या योगायोगाने रुग्णालयातील डॉक्टरही हैराण झाले आहेत.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, फातिमा म्हणाली की, जुळी भावंडे असूनही त्यांची मुले वेगवेगळे वाढदिवस साजरे करतील, हे जाणून तिला धक्का बसला. हॉस्पिटलमध्ये महिलेची प्रसूती करणाºया डॉक्टर अ‍ॅना अब्रिल म्हणाल्या की, जुळ्या मुलांची ही प्रसूती तिच्या कारकिदीर्तील सर्वात संस्मरणीय प्रसूती असेल. ती म्हणाली २०२१ आणि २०२२ मध्ये माझ्या हातून जुळ्या मुलांचा जन्म झाला हे माझे भाग्य आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या जोडप्याला आधीच २ मुली आणि एक मुलगा आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …